अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault व्हाॅट्सअपवर चुकून आलेल्या मॅसेजमुळे झालेल्या ओळखीनंतर मैत्री झाली. त्याच मित्राने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. सक्करदरा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध पाेक्साेसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. शादाब खान वकील (रा. माेठा ताजबाग) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 23 वर्षीय तरुणी ही ट्युशन क्लास चालविते. आराेपी शादाब खान याचे माेबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. आराेपी हा पूर्वी पीडितेच्या घराजवळच राहत हाेता. 2018 मध्ये त्याने पीडितेचा माेबाईल क्रमांक मिळवून व्हाॅट्सअॅपद्वारे तिच्याशी चॅटिंग केली. मात्र, तरुणीने त्याचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर आराेपीने स्वतःला चाकू मारून जखमी केले आणि तरुणीच्या घरासमाेर पाेहाेचला.sexual assault या घटनेनंतर दाेघांमध्ये संवाद सुरू झाला. आराेप आहे की, आराेपीने लग्नाचे खाेटे आश्वासन देत तरुणीला घराच्या छतावर बाेलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अनेकवेळा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आराेपीने नकार देत तिला धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून सक्करदरा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध पाेक्साे आणि अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली आहे.