दोन ट्रकची समोरासमोर धडक

    दिनांक :19-May-2026
Total Views |
वर्धा,
head-on-collision-between-two-trucks : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर उबदा परिसरात सुरू विकास कामामुळे एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. याच ठिकाणी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही घटना मंगळवार १९ मे रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला.
 
 
K
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर नागपूर-हैदराबाद लेनचे काम सुरू असल्याने एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. ट्रक क्रमांक आर. जे. ११ जी. ए. ९९३० चे चालक बबलू खान (रा. आग्रा) हे जाम येथून हैदराबादकडे जात होते. त्याचवेळी समोरून जामच्या दिशेने येणार्‍या ट्रक क्रमांक एम. एच. ४० बी. जी. ५०३० चे चालक संजय नथुजी सहारे (वय ३४, रा. दिघोरी नाका, नागपूर) यांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संबंधित दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात संजय सहारे हे गंभीर जखमी झाले. शिवाय दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पीएसआय तोडासे यांच्यासह त्यांच्या सहका—यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. जखमी चालकाला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला केल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.