शेवाळ युक्त पाण्यामुळे मुक्या प्राण्याचे आरोग्य धोक्यात

नियमित स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

    दिनांक :19-May-2026
Total Views |
उंबर्डा बाजार, 
algae-infested-water : येथील बैल बाजार परिसरातील मुख्य असलेल्या जनावराच्या पिण्याच्या पाण्याच्या टायात मोठ्या प्रमाणात शेवाळ झाल्यामुळे जनावरांचे आरोग्य धोयात येण्याची शयता निर्माण झाली आहे. ग्राम उंबर्डा बाजार येथील बैल बाजार परिसरातील असलेल्या गुरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याची नियमित साफसफाई करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतकडे असली तरी मात्र याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ झाले असल्याने जनावरांना विविध रोगांची लागण होण्याची भीती शेतकर्‍यामध्ये निर्माण झाली आहे.
 
 
NH
 
उन्हाचा पारा मे च्या पहिल्याच आठवड्यात ४४ अंशाच्या वर गेल्यामुळे जंगलातील नदी नाले ओस पडले आहेत. त्यामुळे मुया प्राण्यांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होत असतानाचे चित्र परिसरात दिसून येत आहे. म्हणुन मुया प्राण्यांना याच टायाच्या आधारावर आपली तहान भागवावी लागते.
 
 
मात्र या टायाची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचले असल्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असून जनावरे या टाया कडे पाठ फिरवीत आहे. तरी ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन टायाची साफसफाई करून स्वच्छ पाणी सोडण्याची मागणी पशुधन पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.