रोहित-कोहलींसह पंड्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

BCCI निवड समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई
BCCI Selection Committee today २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला गती मिळाली असून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या आगामी मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मालिकेत प्रथम एक कसोटी सामना आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
 
BCCI
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दोन्ही मालिकांसाठी संघ निवड प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी आज महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. BCCI Selection Committee today या बैठकीत मुख्य निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली संघ निवडीवर चर्चा होणार असून अंतिम संघ निश्चित केला जाणार आहे.
 
या निवड प्रक्रियेत अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोघांचा समावेश जवळपास निश्चित मानला जात असला तरी कामगिरी आणि तंदुरुस्तीच्या निकषांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत. BCCI Selection Committee today तसेच रवींद्र जडेजा यांच्याबाबतही विचार केला जाण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजी क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याने संघ व्यवस्थापन अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डी यांना संधी देण्याचा विचार करत असल्याचेही समोर आले आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.