शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत सुधार करा

प्रबुद्ध नागरिकांची पोलिस आयुक्ताकडे मागणी

    दिनांक :19-May-2026
Total Views |
अमरावती, 
improve-the-citys-transportation : शहरातल्या ढासळलेल्या वाहतूक व्यवस्थेत सुधार करण्याचा प्रमुख मागणीसाठी प्रबुद्ध नागरिकांनी आज माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे नेतृत्वात पोलिस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेतली.
 
 
K
 
 
 
अमरावती शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षा मध्ये अत्यंत झपाट्याने वाढलेली आहे. त्यामुळे रस्त्यावर व्यावसायिक मोठी वाहने, चारचाकी वाहने व दुचाकी वाहनांची संख्या पण वाढलेली आहे. एका काळात अमरावती शहरातील रस्ते वाहतूक ही सुरळीत होती. परंतु, सद्य स्थितीत या वाढत्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी व शहरांतर्गत बाजारपेठेतील वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांचा शहर वाहतूक विभाग अद्यापही पारंपरिक पद्धती वापरत आहे. शहरात वाहतुकीची प्रचंड अनागोंदी माजलेली असताना वाहतूक विभाग यापासून कोणताही बोध घेताना दिसत नाही.
 
 
तसेच शहराच्या मुख्य बाजारपेठेतील उड्डाणपुलाखाली घुमंतूंच्या वास्तव्याने व्यापारी त्रस्त आहे. या सर्व समस्यांचा तातडीने सोडवाव्यात यासाठी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे नेतृत्वात शहरातील डॉक्टर्स, ज्येष्ठ विधीज्ञ व व्यापारी व अन्य अशा प्रबुद्ध नागरिकांनी आज पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वाहतूक व्यवस्थेतील अडचणी व त्या सुधारण्याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करून सुरक्षित रस्ते वाहतूक नागरिकांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या शिष्टमंडळामध्ये विलास मराठे, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, वरिष्ठ अधिवक्ता के. एस. देशपांडे, वरिष्ठ इएनटी तज्ञ डॉ. बबन बेलसरे, हृदयरोग तज्ञ डॉ. अजय डफळे, डॉ.अनिल रोहनकर, अ‍ॅड. खोरगडे, अतुल गायगोले प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर चिंता व्यक्त करून निवेदन सादर केले.
 
 
पोलिस आयुक्तांनी घेतली दखल
 
 
प्रबुद्ध नागरिकांनी दिलेल्या या निवेदनाची दखल पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी लगेच घेतली. स्वत: रस्त्यावर उतरून त्यांनी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या. जे नियम पाळत नाही, त्यांनाही समज देण्यात आली. याचा किती परिणाम होतो, हे पाहावे लागेल.
(निवेदन : शहरातले प्रबुद्ध नागरिक पोलिस आयुक्तांना निवेदन देताना)