वाशीम,
vidya-bharati-teachers-training-workshop : विद्याभारती विदर्भ प्रांताचा आचार्य प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ रेखाताई राष्ट्रीय विद्यालय वाशीम येथे १९ मे रोजी वाशीम जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या भारती विदर्भ प्रांत अध्यक्ष सचिन जोशी होते. प्रमुख उपस्थिती मध्ये विद्या भारती विदर्भ प्रांत उपाध्यक्ष सत्यानंद कांबळे आणि विद्या भारती वाशीम जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल धुमकेकर होते. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि विद्या भारती विदर्भ देवगिरी प्रांताचे संघटन मंत्री शैलेश जोशी होते. दीपप्रज्वलन आणि वंदनेने कार्यक्रम प्रारंभ झाला. प्रमुख वक्ते शैलेश जोशी यांनी विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानचा परिचय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आचार्य प्रशिक्षण वर्गात होणारे उपक्रम याची माहिती दिली. उद्घाटक मंगल धुपे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर निवासी आचार्य प्रशिक्षण वर्गाचे कौतुक करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग संचालिका निर्मला महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अनिल धुमकेकर यांनी केले. वर्गाच्या संचालिका अनुपमा वालदूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विद्या भारती विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रांजली जोशी, मंत्री रोशन आगरकर, विदर्भ प्रांत सहमंत्री प्रा. दिलीप जोशी, रणदीप बिसणे, सुभाष, प्रा.रमेश आरु, प्रा.श्रीकांत जोशी यांची विशेष उपस्थिती होती.