जेजुरीत सुरक्षेचा थाट; भेसळखोरांची लागणार वाट!

    दिनांक :19-May-2026
Total Views |
जेजुरी,
jejuri-news : जेजुरी येथे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भंडारा (हळद) वापराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अन्नसुरक्षेबाबत कठोर पावले उचलली आहेत. यात्रोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या गुणवत्तेची तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


jejuri
 
 
 
अलीकडच्या काळात जेजुरी परिसरात भंडाऱ्याच्या वापरामुळे काही अपघात आणि आरोग्यविषयक धोके समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक यंत्रणांना तपासणी अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
धार्मिक स्थळ असल्याने मोठ्या संख्येने भाविक जेजुरीला भेट देतात. त्यामुळे अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. भंडारा उत्पादन व विक्रीवर देखरेख ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे.