इस्त्राईलमध्ये आरोग्य क्षेत्रात नोकरीची संधी

-होम बेस्ड केअरगिव्हरची 3500 पदे रिक्त -1 लाख 99 हजार रुपये दरमहा पगार

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
job-opportunities : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राबविण्यात येणाèया ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पामार्फत इस्त्राईल देशात आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील कुशल युवक-युवतींना जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
 
 
J
 
 
 
या प्रकल्पांतर्गत इस्राईलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ (घरगुती काळजीवाहू) पदासाठी एकूण 3500 रिक्त जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 90 टक्के महिला व 10 टक्के पुरुष उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी.
 
 
या पदासाठी उमेदवाराचे वय 25 ते 45 असावे. किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केल्याचे भारतीय मान्यताप्राप्त प्राधिकरणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 
 
 
तसेच नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरीमधील डिप्लोमाधारक उमेदवारही पात्र राहतील. जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग आणि पोस्ट बीएससी नर्सिंग उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे.
 
 
उमेदवाराकडे किमान तीन वर्षे वैध असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आठवड्यात सहा दिवस काम करावे लागणार असून अंदाजे 1 लाख 99 हजार 770 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय विमा, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
 
 
केअरगिव्हरना वृद्ध व अपंगांची देखभाल, स्वच्छता, अंघोळ, कपडे बदलणे, औषधे देणे, स्वयंपाक, खरेदी, घरकाम आदी जबाबदाèया पार पाडाव्या लागणार आहेत. कराराचा कालावधी दोन वर्षांचा असून तो नूतनीकरणीय राहणार आहे. उमेदवारांची मुलाखत ऑनलाईन व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे घेण्यात येणार असून अंतिम निवडीचा निर्णय इस्रायली नियोक्त्याकडून घेतला जाईल. एनएसडीसी ही संस्था समन्वयक म्हणून कार्य करणार आहे.
 
 
इस्राईलमध्ये हेल्थकेअर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाèयांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त प. भ. जाधव यांनी केले आहे.