नागपूर,
Badminton Tournament स्व. माधव लक्ष्मण देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित “स्व. माधव लक्ष्मण देशपांडे स्मृती बॅडमिंटन स्पर्धा” न्यू मनीष नगर येथील सुपर स्मॅशर्स क्लबमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. झालेल्या या स्पर्धेत स्थानिक बॅडमिंटन खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. डीपी रोड, न्यू मनीष नगर येथील सुपर स्मॅशर्स क्लबच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी चुरशीचा आणि दर्जेदार खेळ सादर केला.
या स्पर्धेचा उद्देश दिवंगत माधव लक्ष्मण देशपांडे यांच्या स्मृतीला उजाळा देणे तसेच तरुणांमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा होता. सकाळच्या वेळेत झाल्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना आयोजक समितीच्या वतीने गौरविण्यात आले. Badminton Tournament अशा स्पर्धांमुळे स्थानिक पातळीवरील खेळाडूंना व्यासपीठ मिळते आणि बॅडमिंटनसारख्या खेळाला चालना मिळते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सौजन्य: स्वाती फडणवीस, संपर्क मित्र