महादेव मठ संस्थानतर्फे भव्य सर्वधर्मीय चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापनदिन सोहळा

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
mahadev-math-sansthan : महादेव मठ संस्थान हदगावतर्फे 19 ते 21 मे कस्तुरी मंगल कार्यालयासमोर भव्यदिव्य सर्वधर्मीय चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापनदिन सोहळा होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून पंचक्रोशीतील गावकèयांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक व्यापक आणि भव्य आहे.
 
 
y19May-Mahadev
 
 
 
या धार्मिक सोहळ्याची सुरुवात शिवयोगी बसवलिंग स्वामी यांच्या संजीवन समाधी रुद्राभिषेकाने होणार आहे. त्यानंतर रुद्र स्वाहाकार पंचकुंडी यज्ञ, भव्य पारायण, संकीर्तन, धर्मसभा तसेच नगरभोजन होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
या सोहळ्यास उज्जैन येथील जगद्गुरु सिद्धलिंगराज देशीकेंद्र शिवाचार्य महास्वामींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हत्तीवरील भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या आकर्षक सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाखो भाविक, विविध पंथांचे साधुसंत तसेच सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
 
 
सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने हा धार्मिक सोहळा होत आहे. महादेवमठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांनी सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मोपदेश, साधुसंतांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.