पाणीक्रांतीतूनच महाराष्ट्र हाेणार आत्महत्यामुक्त

- नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

    दिनांक :19-May-2026
Total Views |
‘जलक्रांती परिषद 2026’ मध्ये जलसंवर्धनासाठी लाेकचळवळीची हाक
नागपूर, 
maharashtra becomes suicide free आजपासून जवळपास 25 वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांच्यासाेबतच्या रथयात्रेत प्रथमच यवतमाळातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची व्यथा पाहिली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातील शेतकरी आत्यहत्येचे प्रमुख कारण असल्याचे लक्षात आले. तेव्हापासूनच पूर्ती सिं चन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी सुरू केलेले काम आजतागायत सुरू आहे. हे काम आता लाेकचळवळ हाेण्याची गरज असून यातून घडणाèया पाणीक्रांतीने महाराष्ट्र आत्महत्यामुक्त हाेणार, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
 
 
 
maharashtra becomes suicide free
 
 
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या राैप्य महाेत्सवानिमित्त रविवारी ‘जलक्रांती परिषद 2026’ चे आयाेजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाेते. परिषदेला राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठाेड, नाम ाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख, गाेंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते.
गडकरी म्हणाले, गावातील पाण्याचा प्रत्येक थेंब गावातील जमिनीतच जिरला तर शेती समृद्ध हाेईल आणि यातून शेतकरी आर्थिकदृष्या सशक्त हाेईल. सरकार त्यांच्या स्तरावर काम करीत आहे. पण नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत. पूर्ती संस्थेने गेल्या 25 वर्षांत जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. बुलढाणा पॅटर्न, तामसवाडा पॅटर्न यांसारख्या प्रयाेगांचा उल्लेख करत त्यांनी प्रत्येक गावात नदीचे खाेलीकरण, रुंदीकरण आणि जलसाठा निर्माण करण्याची चळवळ उभी राहण्याची गरज व्यक्त केली.maharashtra becomes suicide free पाण्यासह वायू आणि ध्वनी प्रदूषणही चिंतेचा विषय आहे. नदी स्वच्छ ठेवणे ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी ‘वेस्ट टू वेल्थ’ आणि ‘नाॅलेज टू वेल्थ’ या संकल्पनांवर भर दिला. विदर्भातील सर्व जिल्हे आत्महत्या-मुक्त करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
डाॅ. प्रशांत बाेकारे यांनी गाेंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणाèया जलसंधारण आणि कृषी विकास प्रकल्पांची तर डाॅ. शरद गडाख यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या संशाेधनााविषयी माहिती दिली.
मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी ‘जलक्रांती’, ‘जलपर्व’, ‘काॅरिडाेअर ऑफ वाॅटर सिक्युरिटी’ आणि ‘कृषिकल्याण’ या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रवीण भालेराव, सचिन कुळकर्णी आणि राजेंद्र क्षीरसागर यांनी या पुस्तकांसाठी विशेष याेगदान दिले. आमदार किशाेर जाेरगेवार, माजी खा. सुनील मेंढे, आ. परिणय ुके, जिल्‍हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापाैर नीता ठाकरे, माफसूचे कुलगुरू डाॅ. नितीन पाटील आदींची यावेळी उपस्थिती हाेती.
आजची जलक्रांती ही आपल्या भविष्यासाठी - राठाेड
पाणी हा मानवी अस्तित्वाचा प्राण आहे. त्यामुळे उद्यासाठी पाणी वाचवून ठेवणे ार आवश्यक आहे. हवामान बदल, असमान पाऊस, भूजलसाठ्यात हाेत असलेली घट आणि प्रदूषण ही संकटे मानवाने स्वतःहून ओढावून घेतली आहे. या सर्व समस्यांची साखळी राेखण्यासाठी जलसंवर्धन ही लाेकचळवळ हाेण्याची गरज राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठाेड यांनी अधाेरेखित केली. आजची जलक्रांती ही उद्याचे भविष्य वाचविण्यासाठी आहे असेही ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातच आम्ही घडलाे असून राज्याच्या विविध उपक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली.