बुलढाण्यात एटीएस ची मोठी कारवाई

-दोन पिस्तूल ; 92 जिवंत काडतुसांसह तिघांना केली अटक -अकोला एटीएस च्या टीमची कारवाई !

    दिनांक :19-May-2026
Total Views |
खामगाव,
ats in buldhana बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एटीएस कडून कारवाई करण्यात आली आहे. अंत्रीकोळी गावात पिस्तुल आणि काडतूसे घेऊन आलेल्या शुभम पवार नामक युवकाला त्याच्या 2 साथीदारांसह अटक करण्यात आली आहे.
 
 

ats in buldhana 
 
 
केलेल्या कारवाईतून शुभम पवार यांच्याकडून दोन पिस्टल तब्बल 92 जिवंत काडतुसे कार मोबाईल असा सात लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ats in buldhana  इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र घेऊन मोठ्या घातपाताच्या तयारीत असणाऱ्या तिघांवर एटीएसने वेळीच कारवाई केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिकचा तपास एटीएस कडून केला जातोय..