नागपूर,
Umiyashankar High School श्री उमियाशंकर नारायणजी हायस्कूलमध्ये दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला योगेश पटेल, नरेंद्र झा, खेतालाल पटेल, महेंद्र पटेल, चंद्रेश बदाणी, धिरज पटेल, विनोद पटेल यांच्यासह मुख्याध्यापिका गुप्ता, पर्यवेक्षक अमृतलाल खेतानी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल कौतुक करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
सौजन्य: दिनेश टेकाडे, संपर्क मित्र