चारा टंचाई अभावी स्थलांतरण थांबविण्यासाठी उपाययोजना करा : डॉ. भोयर

*कारंजा व आर्वी तालुक्यातील १५ गावातील आढावा

    दिनांक :19-May-2026
Total Views |
वर्धा,
pankaj-bhoyar : कारंजा व आर्वी तालुयातील १५ गावांमधील चारा टंचाईमुळे पशुपालक दरवर्षी स्थलांतरीत होत आहे. त्यांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी स्थलांतरीत होणार्‍या पशुपालकांची गावनिहाय बैठक घेऊन त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी चारा टंचाईबाबत आयोजित बैठकीत केल्या.
 

J 
 
बैठकीला आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरविर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, सुधीर दिवे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्याधिकारी विजय देशमुख, कारंजा व आर्वी तालुयातील चारा टंचाईग्रस्त गावातील नागरिक उपस्थित होते.
 
 
आर्वी तालुयातील चांदणी, बोथली (पा.), सालदरा, गुमगाव, बेढोणा, तळेगाव रघुजी, किन्हाळा, पांजरा, बोथली हेटी तर कांरजा तालुयातील दानापूर, बांगडापूर, धामकुंड, माळेगाव काळी, भिवापूर व चोपन या १५ गावात पाणी टंचाईमुळे गावातील पशुपालक स्थलांतरीत होत आहे. वन विभागाने त्यांच्या वन जमिनीवर लागवड केलेला चारा पशुपालकांना उपलब्ध करुन देण्यासोबतच चारा टंचाई बाबत केलेल्या नियोजनाच्या आराखड्यातील कामे तात्काळ सुरू करावी, अशा सूचना सर्व संबंधीत विभाग प्रमुखांना त्यांनी दिल्या.
 
 
सदर बैठकीस आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, आर्वी व कांरजा तालुयातील वन परिक्षेत्र अधिकारी आभासी उपस्थित होते.
 
 
उबार लघु प्रकल्पातील पुनर्वसन
 
 
सुकळी लघु प्रकल्पातील पुनवर्सन करण्यात आलेल्या आंजी येथील पुनर्वसन वस्तीतील रित असलेले भूखंड भूमीहीन लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत बेघर लाभार्थ्यांना देण्यासाठी मागणी आंजी येथील गावकर्‍यांकडून करण्यात आलेली आहे. पुनर्वसित वस्तीतील भूखंड पुनर्वसन अधिनियम १९९९ अंर्तगत केवळ पुनर्वसित लाभार्थ्यांनाच देता येत असल्यामुळे गावठाणातील जमीन हस्तांतरण नियमानुसार हस्तांतरणासाठी राज्य शासनाकडे भूखंड हस्तांतरणासाठी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.