एनएचएम अभियानाला सहा महिन्यांची मुदतवाढ

*जिल्ह्यातील ६१० अधिकारी, कर्मचारी संभ्रमात

    दिनांक :19-May-2026
Total Views |
वर्धा,
nhm-campaign : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाला (एनएचएम) केवळ सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून या अभियानात कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चिंता वाढली आहे. सरकार हे अभियान गुंडाळण्याच्या तयारीत तर नाहीना, असा संभ्रम कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाला आहे.
 
 
K
 
 
 
राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०२६ नंतर सहा महिन्यांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत सुरू राहील, असे आरोग्य मंत्रालयाच्या मिशन संचालकांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान १२ एप्रिल २००५ रोजी सुरू करण्यात आले होते. २०१३ मध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची पुनर्रचना करून एनएचएमची स्थापना करण्यात आली. या अभियानाच्या मुदतीत दर पाच वर्षांनी वाढ केली जाते. जिल्ह्यातील ६१० आणि राज्यभरातील अंदाजे ४० हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहेत. डॉटर, स्टाफ नर्स, एएनएम, लॅब टेनिशियन, फार्मासिस्ट, कार्यक्रम प्रशासक, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, आशा समन्वयक आणि आरोग्य विभागातील अनेक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून अविरतपणे सेवा बजावत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांचे एकत्रीकरण करून राबवले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारणे, कुपोषण नियंत्रण, माता व बालमृत्यू कमी करणे, आरोग्य केंद्रे बळकट करणे, लसीकरण, संसर्गजन्य रोगांवर उपाययोजना, आशा कार्यकर्त्या उपलब्ध करणे, कुटुंब नियोजन, क्षयरोग निर्मूलन, मानसिक आरोग्य सुधारणे, डायलिसिस आणि आपत्कालीन आरोग्यसेवा यांसारख्या इतर आरोग्य सेवांमध्ये हे कर्मचारी योगदान देत आहे. मात्र, या कर्मचार्‍यांना फत सहा महिनेच मुदतवाढ मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
 
 
...अन्यथा राज्यव्यापी आंदोलन
 
 
राष्ट्रीय आरोग्य अभियानाची अंतिम मुदत सहा महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आमचे लक्ष सरकारच्या पुढील आदेशावर केंद्रित आहे. आम्ही कोविड महामारीच्या काळात आमच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली आहे. जर ही मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला गेला, तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा एचएनएम समन्वय कृती समितीच्या जिल्हाध्यक्ष अन्नपूर्णा ढोबळे यांनी दिला आहे.