‘काय डोंगर, काय दèया...आता विसरा’

- ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरही येणार टाच आमदार-नगरसेवकांचा ‘असा‘ मुक्काम वांध्यात!

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई
 Legislative Council elections विधान परिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह सहा राज्यात आचारसंहिता लागू केली आहे. सोबतच निवडणुकीतील काही गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीत मतदारांना (आमदार, शिक्षक, पदवीधर) हॉटेल,् रिसॉर्ट किंवा तत्सम ठिकाणी ठेवणे हे लाच देण्यासारखे मानले जाईल आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 171 (ब) अंतर्गत तो गंभीर गुन्हा ठरेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
 
hotel politics 
 
Legislative Council elections आयोगाने नुकताच महाराष्ट्रातील 16 जागांसह इतर पाच राज्यांतील विधान परिषदेच्या काही जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी स्वतंत्र परिपत्रकही जारी केले. पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये ही आचारसंहिता काटेकोरपणे लागू राहील, असे यात नमूद करण्यात आले आहे.
 
Legislative Council elections  निवडणुकीच्या काळात मतदारांना हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये ठेवण्याच्या प्रथेला आयोगाने स्पष्टपणे आळा घातला आहे. अशा प्रकाराला आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाईल. शिवाय तो शिक्षापात्र गुन्हाही ठरेल. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निर्णय अधिकारी यांच्या बदल्यांवरही पूर्ण बंदी राहणार आहे.