अनिल कांबळे
नागपूर,
women missing महिला आणि मुली बेपत्ता हाेण्याच्या वाढत्या घटनांमुळे देशातील कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात देशातून 3 लाख 52 हजार 729 तरुणी-महिला बेपत्ता झाल्या आहेत. देशात पश्चिम बंगाल राज्य पहिल्या स्थानावर तर महाराष्ट्राचासुद्धा तिसरा क्रमांक लागत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. ही धक्कादायक आकडेवारी एनसीआरबीने नुकताच जाहीर केलेल्या अहवालातून समाेर आली आहे.

अहवालानुसार, देशात दरराेज शेकडाे महिला आणि मुली बेपत्ता हाेत असून अनेक प्रकरणांमध्ये मानव तस्करी, जबरदस्ती मजुरी, लैंगिक शाेषण तसेच साेशल मीडियाद्वारे फसवणुकीचे प्रकार कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राेजगाराचे आमिष, नाेकरीचे आमिष, प्रेमसंबंध, काैटुंबिक वाद आणि अल्पवयीन मुलींचे ऑनलाईन जाळ्यात अडकणे ही देखील महत्त्वाची कारणे आहेत. बेपत्ता झालेल्या महिलांची राज्यनिहाय आकडेवारी लक्षात घेतल्यास सर्वाधिक महिला पश्चिम बंगाल राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. या राज्यातून 46 हजार 838 तरुणी-महिला बेपत्ता झाल्या आहेत. दुसèया स्थानावर मध्यप्रदेश राज्य असून 46 हजार 732 महिलांची बेपत्ता म्हणून पाेलिस दप्तरी नाेंद आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्र राज्यातून 45 हजार 910 तरुणी-महिला बेपत्ता झाल्या आहेत. चवथ्या स्थानावर असलेल्या राजस्थानमधून (30,336) आणि पाचव्या स्थानावर असलेल्या तामिळनाडूतील 22,564 महिला बेपत्ता झाल्याची नाेंद आहे.women missing वयाच्या 18 वर्षांवरील तरुणी आणि महिलांमध्ये बेपत्ता हाेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सामाजिक वातावरण ढवळून निघत आहेत. महिला सुरक्षेबाबत वाढती चिंता लक्षात घेता विविध सामाजिक संघटना आणि महिला आयाेग यांच्यासह केंद्र व राज्य सरकारने संयुक्त विशेष माेहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक तरुणी-महिला देहव्यापारात
वयात आलेल्या तरुणी आणि विवाहित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्या जाते. त्यानंतर त्यांना बळजबरी देहव्यापाराच्या दलदलीत ढकलल्या जाते. बेपत्ता झालेल्या महिलांसाेबत देहव्यापारात ढकलल्याच्या घटनांची सर्वाधिक नाेंद आहे. यासाेबतच मुलींचे धर्मांतरण करुन त्यांना बंदिस्त करुन ठेवण्यात येते. तसेच चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष किंवा नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणींची थेट देहविक्रीसाठी वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे.
देशातील 3.52 लाखांवर तरुणी-महिला बेपत्ता
पाेलिस विभागाचे अपयश
बेपत्ता झालेल्या तरुणी किंवा महिलेची तक्रार घेऊन कुटुंबीय पाेलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्यासाेबत पाेलिस अधिकारी आणि कर्मचारी साैजन्याने वागत नाहीत. सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कुटुंबीयांची तक्रार घेण्यासाठी पाेलिस टाळाटाळ करतात. तक्रार घेतल्यास त्यावर काेणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे बेपत्ता हाेणाèया महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. बेपत्ता महिलांचा शाेध घेण्यासाठी तैनात पाेलिस पथक थातूरमातूर शाेध घेतल्याचे भासवतात. संवेदना हरविलेले पाेलिस बेपत्ता तरुणी शाेधण्यासाठी गांभीर्य दाखवत नसल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे.
..............