नागपूर,
paper-leak-case : नीटचा पेपर फोडणार्यांना कायद्याची भिती वाटली पाहिजे. कठोर शिक्षा करणारा कायदा राज्य शासनाने करावा, अशी मागणी मनसेचे युवा नेते अमीत ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मुख्यत: नीटचा पेपर फुटणे हे काही पहिल्यांदा झालेले नाही. नीटचा एक एक पेपर १५ ते २० लाखाला विकला जातो. एनटीएचएसचे लोक खाजगी क्लासेसशी संबंधित आहेत. या गोष्टी वारंवार घडवून आणणार्यांवर कारवाई आहे. पेपर फुटी संदर्भात कायदा झाल्यास हा प्रकार थांबविण्यासाठी मदत होणार आहे.
केवळ नीटची परीक्षा रद्द करणे हा पर्याय नव्हे, यावर काठोर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,याकडे अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,याकडे शासनाने लक्ष द्यावे.
मनसेच्या संघटन बांधणीसाठी विदर्भाचा दौरा करणाार आहे. तसेच राज ठाकरे यांच्या सोबत असणार्या पदाधिकार्यांना भेटून पक्ष वाढविण्याचा निर्धार केला असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.
इंधन बचतीवरून केंद्र व राज्य सरकार वारंवार सांगत आहे की आता देशभक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. मात्र इंधन वाचविण्यासाठी चार चाकी वाहन सोडून दुचाकी वाहनांचा मोठा फौजफाटा ठेवणे आहे का, असा प्रश्न केला.