यवतमाळ,
pharmacists-strike : विविध मागण्यासाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघातर्फे बुधवार, 20 मे रोजी बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 2 हजार 558 औषध विक्रेते सहभागी राहणार आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करण्यात यावी, अनधिकृत ई-फार्मसीवर कारवाई करण्यात यावी, स्थानिक औषधी दुकानदारांना संरक्षण द्या, फार्मासिस्टच्या व्यावसायिक भूमिकेला अधिक मान्यता देण्यात यावी, आदी विविध मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्यात, असे निवेदन शासनाकडे देण्यात येणार असल्याची माहिती संदीप पिंपळकर व संघातील पदाधिकाèयांनी दिली.