नागपूर,
heat wave गत काही दिवसांपासून उन्हाच्या झळा व असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. उन्हाच्या तडाखा कायम असल्याने दिवसभर घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. सोमवारी नागपूरचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस नोंदविले. तर विदर्भात सर्वाधिक तापमान वर्धा ४६.५ अंश सेल्सिअस होते. सुरु होण्यापूर्वीच नागपूरचे तापमान वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.
गरम हवेमुळे उकाडा वाढला
मुख्यत: वाढत्या उष्णतेमुळे एअर कुलरही प्रभावहीन ठरत आहेत. दिवसभर कडक उन्ह आणि सायंकाळनंतर गरम हवेमुळे उकाडा जाणवत आहे. रविवार प्रमाणेच सोमवारी सुध्दा कडक उन्हाचा तडाखा जाणवत होता. रविवारी नागपूरचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस होते. उष्णलाटेचा पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाचे सर्वाधिक चटके सहण करावे लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे शनिवारी खाली आलेला नागपूरचा पारा रविवारनंतर सोमवारी सुध्दा ४४.४ अंश सेल्सिअस होता.
उष्णतेच्या लाटेचा प्रकोप
नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू असून दिवसभर उकाडा आणि वादळाची स्थिती निर्माण होत असते. गत पाच दिवसांपासून नागपुरात उष्ण लहरींमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.heat wave नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन दिवस नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, अकोला येथे उष्ण लहरींचा इशारा दिला असून बुधवार, २० मे रोजी कमाल तापमान ४६ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.