लोकशाही वाचविण्यासाठी समाजकारण आणि राजकारण

-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन -रामदास आठवले मित्रपरिवारातर्फे नागरी सत्कार

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नागपूर,
ramdas athawale राजकारण आणि समाजकारण करावे लागते. संविधानामुळेच लोकशाही कायम आहे. याचा मला अभिमान आहे. मुख्यत: लोकशाही वाचविण्यासाठी समाजकारण आणि राजकारण दोन्ही आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

ramdas athawale 
 
 
धरमपेठ येथील वनामती सभागृहात रामदास आठवले मित्रपरिवारातर्फे नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ओबीसी नेते प्राचार्य बबनराव तायवाडे,गिरीश गांधी, निलेश खांडेकर, बाळू घरडे, माजी कुलसचिव पुरण मेश्राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित या सत्कार कार्यक्रमात प्रमुख डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रामदास आठवले पुढे म्हणाले, दलित पँथरच्या चळवळीतून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत असताना मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार चळवळीला यश मिळाले. यानंतर मी राजकारणात केव्हा आलो हे कळलेच नाही.
 
चौथ्यांदा सुध्दा राज्यसभेत जाईल
मुख्यत: राज्यसभेत मला आता तिसर्‍यांदा संधी मिळाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करीत असल्याने जबाबदारी वाढली आहे. देशातील गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. सरकारमध्ये अधिक चांगले काम करीत असल्याने माझी दखल घेतल्या जाते. यानंतर सुध्दा चौथ्यांदा सुध्दा मी राज्यसभेत जाईल,असा विश्वास व्यक्त
समाजातील गरीबांना आरक्षण मिळावेत
राकाँचे नेते शरद पवार यांच्या ऑफरमुळेच मी राजकारणात आलो, अशी कबुली देत रामदास आठवले पुढे म्हणाले, राज्यात काँग्रेससोबत युती असताना आरपीआयने पाठींबा दिल्याने मंत्रीपद मिळाले होते.
मंडल आयोगाच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यात यश मिळाले. ओबीसी व मराठा समाजातील गरीबांना आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी कायम आहे.ramdas athawale केवळ धर्माच्या नावाने नव्हे तर कोणत्याही समाजातील गरीबांना आरक्षण मिळावेत, असा माझा प्रयत्न आहे. स्वतंत्र विदर्भ व्हावा,यासाठी मी प्रयत्न करणार असून आगामी काळात स्वतंत्र विदर्भ झाल्यास दोन राज्य तयार होतील. त्यामुळे मुख्यमंत्री दोन राहणार असल्याने आमच्या पक्षाला सुध्दा यात न्याय मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त
लोककल्याणार्थ कार्य करणारे नेते
प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ.वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, समाजसेवेला प्राधान्य देणारे रामदास आठवले हे राजकारण करणारे नेते नाही, तर लोककल्याणार्थ कार्य करणारे नेते होय. यांनी अनेक आंदोलने केली. मात्र मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनामुळे त्यांना समाजाचे प्रश्न कळले.
अध्यक्षीय भाषणात पुरण मेश्राम म्हणाले, दलित पँथरच्या चळवळीच्या माध्यमातून आठवले यांनी मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न सोडविला. डॉ.बबनराव तायवाडे म्हणाले, मंडल आयोगाच्या आंदोलनामुळेच ओबीसी समाजाला न्याय मिळला. आजच्या घडीला तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे कार्य रामदास आठवले करीत आहे.