मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
electoral-rolls : भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाèयांच्या सूचनेनुसार, यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे.
 
 
K
 
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच मतदार याद्या अधिक अचूक व पारदर्शक करण हा मुख्य उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 
 
त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अर्हता 1 ऑक्टोबर 2026 राहणार असून 20 ते 29 जून या कालावधीत तयारी, प्रशिक्षण व छपाईची कामे पार पडतील. तसेच 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओमार्फत घरोघरी भेटी घेऊन प्रगनणा करण्यात येणार आहे. तसेच 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येईल.
 
 
 
5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकतींचे निवारण 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येईल. अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे.
 
 
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी, विशेषतः ज्यांनी अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही किंवा मतदार यादीतील माहितीत बदल करावयाचा आहे, त्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. बीएलओ घरोघरी येतील तेंव्हा त्यांना प्रगणना अर्जामध्ये माहिती भरण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.