वणा नदीत आत्महत्या

    दिनांक :19-May-2026
Total Views |
हिंगणघाट, 
suicide-in-the-vana-river : वणा नदी पुलाखालील नदीत पराग भोरे (३४) रा. संत तुकडोजी वार्ड याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, पराग भोरे याने गिमाटेस येथे नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याचे १ वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला तीन महिन्यांची मुलगी आहे. दरम्यान, पराग भोरे हा १८ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी कुणालाही न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याची पत्नी व नातेवाईकांनी परिसरात तसेच विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही.
 
 

J LK
 
 
 
याप्रकरणी हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे तक्रारही दाखल करण्यात आली होती. आज मंगळवार १९ रोजी सकाळी काही मच्छीमार वणा नदीच्या पुलाखाली मासेमारी करत असताना त्यांना नदीत मृतदेह असल्याचा संशय आला. याबाबत नातेवाईकांनाही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले व पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर मच्छीमारांच्या मदतीने तसेच हिंगणघाट अग्निशामक दलाचे अधिकारी गौरव गाणार यांच्या चमूने मृतदेह बाहेर काढला.