पाणीप्रश्नावर विविध संस्थांनी एकत्र येण्याची गरज

- नाना पाटेकर यांचे जलक्रांती परिषदेत प्रतिपादन

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नागपूर,
Nana Patekar ‘नाम फाऊंडेशन’चे काम हे एका व्यक्तीचे नसून सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. पाणी हा राज्यातील अत्यंत ज्वलंत प्रश्न असून, त्यावर विविध संस्था आणि समाजघटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते तथा ‘नाम फऊंडेशन’चे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले.
 

Nana Patekar 
 
 
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या राैप्यमहाेत्सवानिमित्त रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित ‘जलक्रांती परिषद 2026’मध्ये ते विशेषत्वाने उपस्थित हाेते. यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आम्ही कलाकार आहाेत. नाटक आणि चित्रपट हे आमचे जग आहे. मात्र, काम करण्याचे खरे समाधान आम्हाला ‘नाम’मुळे मिळाले. शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांची परिस्थिती जवळून पाहिल्यानंतर केवळ आर्थिक मदतीने त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे लक्षात आले. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ठाेस काम उभे करणे आवश्यक हाेते. त्यामुळे शेतकरी विधवांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. पुढे ते म्हणाले, चांगल्या कामासाठी समाजही माेठ्या प्रमाणात मदत करताे. नामला अल्पावधीतच सुमारे 60 काेटी रुपयांची मदत मिळाली. मात्र, हे काम आता थांबता कामा नये.Nana Patekar ते सातत्याने सुरू राहण्यासाठी समाजातील विविध घटकांनी मानवी साखळी निर्माण करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.
माणसामाणसांतील भिंती तुटल्या पाहिजे
आपल्या भावना व्यक्त करताना नाना पाटेकर म्हणाले, हल्ली शहरात राहावेसे वाटत नाही. शहरांमध्ये प्रत्येकाने आपल्या सभाेवती भिंती उभ्या केल्या आहेत. संवाद संपत चालला आहे. त्यामुळे समाजातील प्रश्न शहरातील लाेकांना दिसेनासे झाले आहेत. हे चित्र अत्यंत भीतीदायक आहे. माणूस म्हणून जगताना या भिंती तुटल्या पाहिजे, तसेच गाव, शेतकरी आणि निसर्गाशी नाळ जाेडून काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधाेरेखित केले. नामचे कार्य देशभर विस्तारत असल्याची माहिती देताना त्यांनी नागपुरात संस्थेचे कार्यालय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. भाषणानंतर नाना पाटेकर यांनी मंचावरून खाली उतरून देशभरातून आलेल्या जलतज्ज्ञांचे अभिनंदन व आभार मानले.