भरधाव स्पोर्ट्स बाईकचा थरार जीवावर

- मित्राच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू

    दिनांक :19-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
speeding sports bike लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या स्पोर्ट्स बाईकमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेदांत ईश्वर बुधे (२०, रा. कर्नलबाग, न्यू शुक्रवारी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.
 
 
speeding sports bike
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजताच्या सुमारास वेदांत हा त्याचा मित्र चैतन्य रणधीर जाचक (२८, रा. साईंकृष्ण अपार्टमेंट, सक्करदरा) याच्यासोबत त्याच्या एमएच-४९-सीजी-३१२१ क्रमांकाच्या स्पोर्ट्स बाईकवर फिरण्यासाठी गेला होता. जुना भंडारा रोडवरील नवीन पुलाजवळ पोहोचताच चैतन्यने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे बाईक चालवत समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मागील सीटवर बसलेला वेदांत हवेत उडून दूर जाऊन पडला. अपघातात तो गंभीर जखमी झाला.speeding sports bike त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १२ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेदांतचा मोठा भाऊ अर्पित बुधे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी चैतन्य जाचकविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.