नागपूर,
water conservation campaign जलसंवर्धन ही केवळ शासकीय याेजना न राहता लाेकसहभागातून उभे राहिलेले व्यापक जनआंदाेलन बनले पाहिजे. जलसंपत्ती वाढली, सिंचन विस्तारले आणि शेती समृद्ध झाली तरच विदर्भातील शेतकरी आत्महत्यामुक्त हाेऊ शकताे, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या राैप्यमहाेत्सवानिमित्त आयाेजित ‘नागपूर जलसंवाद 2026’ या राष्ट्रीय परिषदेत ते बाेलत हाेते. डाॅ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडलेल्या या परिषदेत ‘शेतकरी आत्महत्या-मुक्त विदर्भासाठी जलसंवर्धनाचा उपाय’ या विषयावर देशभरातील जलतज्ज्ञांनी मंथन केले. गडकरी म्हणाले, पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामांना वेग देणे आवश्यक आहे. सिंचनक्षमता वाढल्यास शेतकèयांचे उत्पादन आणि उत्पन्न दाेन्ही वाढेल. पाणी हे अनेक समस्यांवरील प्रभावी उत्तर आहे. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी डिझेलवरील अवलंबित्व कमी करून फफ्लेक्स इंजिन आणि साैरऊर्जेचा वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मनसर परिसरात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बिटुमिनपासून रस्ते उभारले जात असून भविष्यात बायाे-एव्हिएशन इंधन निर्मितीतही शेतकèयांचा सहभाग वाढेल, असे त्यांनी सांगितले.
जलसंवर्धनासाठी शासन, तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांचे बहुस्तरीय प्रयत्न आवश्यक असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. नागालँडच्या काेहिमा येथील जल व पर्यावरण तज्ज्ञ स्वेडेविनाे नात्साे यांनी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्याची आवश्यकता अधाेरेखित केली.
‘नाॅर्थ ईस्ट इंडिया वाॅटर टाॅक्स’चे समन्वयक केशव कृष्ण चक्रधर यांनी ‘एल निनाे’च्या परिणामांना कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज व्यक्त करत ‘रिव्हर बेसिन बेस्ड गव्हर्नन्स’ ही संकल्पना मांडली.
सहारनपूर येथील पद्मश्री सेठपाल सिंग यांनी अत्यल्प पाण्यात उत्पादित केलेल्या शिंगाडा शेतीच्या यशस्वी प्रयाेगाची माहिती दिली. तर चित्रकूटचे पद्मश्री जलयाेद्धा उमाशंकर पांडे यांनी पाणी हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत देशभर पाण्यावर संशाेधन करणारी जल विद्यापीठे निर्माण व्हावी अशी अपेक्षा करतानाच करण्याची गरज व्यक्त करतानाच पाण्याचा व्यवसाय थांबविण्याची गरजही अधाेरेखित केली.
देहरादून येथील पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार विजेते अनिल प्रकाश जाेशी यांनी देश रस्त्यांनी जाेडला तसाच पाण्यानेही जाेडला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पाणी, जंगल आणि परिसंस्था यांचे परस्परसंबंध लक्षात घेऊन नियाेजन करण्याची गरज स्पष्ट केली.यावेळी पंढरपूर वाॅटर काॅरिडाॅरवरील लघुपट सादर करण्यात आला.water conservation campaign अमृत सराेवर, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा यांचा समन्वय या प्रकल्पातून दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तिसरे महायुद्ध पाण्यासाठी हाेईल, अशी भीती व्यक्त केली जाते; मात्र ते हाेऊन नये यासाठी उपाय शाेधण्याचे कार्य नितीन गडकरी करीत आहेत. साेबतच पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या कार्याचे काैतुक करत जलसंवर्धन क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर काम हाेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.