अनिल कांबळे
नागपूर,
midc murder case बेराेजगारी आणि दारूच्या व्यसनामुळे आयुष्य विस्कळीत झालेल्या 32 वर्षीय युवकाची त्याच्याच मित्रांनी दगडाने ठेचून हत्या केली. ही धक्कादायक घटना एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दाेन आराेपींना अटक केली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईसासनी राेडवरील पंचशील नगर परिसरात राहणारा अंकुश किशाेर शेंडे (32) हा दारूच्या आहारी गेला हाेता. ताे बेराेजगार हाेता. काैटुंबिक परिस्थिती बिघडल्याने काही वर्षांपूर्वी त्याची पत्नीही त्याला साेडून माहेरी निघून गेली हाेती. 17 मे 2026 राेजी सायंकाळी 7.15 वाजताच्या दरम्यान एमआयडीसी परिसरातील एका धार्मिक स्थळाकडे जाणाèया रस्त्यावर अंकुश हा मित्रांसाेबत दारू पित बसला हाेता. यावेळी किरकाेळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर विक्की उफर् दद्दू संजय माेहाेड (28) आणि मुकुल राेवतेल या दाेघांनी अंकुशवर दगडांनी हल्ला केला. डाेक्यावर आणि शरीरावर गंभीर मार लागल्याने अंकुशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.midc murder case मुख्य आराेपी विक्की उफर् दद्दू माेहाेड याला रविवारीच अटक करण्यात आली हाेती. फरार असलेला दुसरा आराेपी मुकुल राेवतेल यालाही साेमवारी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आराेपी विक्कीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. दुसèया आराेपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पाेलिस करीत आहेत.