उमर खालिदला अंतरिम जामीन फेटाळला!

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Umar Khalid's Interim Bail Rejected दिल्लीतील करकरडूमा न्यायालयाने २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला मोठा दिलासा नाकारत त्याची याचिका नामंजूर केली. उमर खालिदने आपल्या आजारी आईची शस्त्रक्रिया आणि कुटुंबीयांच्या वैयक्तिक कारणांसाठी १५ दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता.अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर वाजपेयी यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. उमर खालिदने न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, तो कुटुंबातील एकमेव मुलगा असल्याने आईच्या शस्त्रक्रियेनंतर तिची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या मामाच्या चहलुम कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठीही काही दिवसांचा जामीन आवश्यक असल्याचे त्याने सांगितले होते.
 
 

Bail Rejected 
खालिदने असेही नमूद केले की, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य विविध ठिकाणी राहतात आणि तोच मुख्य आधार आहे. याआधी काही सहआरोपींना कुटुंबीय कारणांवर अंतरिम जामीन मिळाल्याचे उदाहरण देत त्याने समानतेच्या आधारावर दिलासा मागितला होता. मात्र न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद मान्य केले नाहीत. उमर खालिदवर यूएपीए आणि आयपीसी अंतर्गत गंभीर आरोप आहेत. २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीत त्याच्यावर “मुख्य सूत्रधार” असल्याचा आरोप असून या हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी विरोधातील आंदोलनादरम्यान ही घटना घडली होती.