वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

*किटाळी मेंढा येथील घटना

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नागभीड,
woman-killed-in-tiger-attack : तालुक्यातील किटाळी मेंढाजवळील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवार, 19 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास किटाडी मेंढा येथील वनविकास महामंडळ कक्ष क्रमांक 69 येथे घडली. मृतक महिलेचे नाव वनिता शंकर उईके (55) असे आहे.
 
 
KL
 
मंगळवारी सकाळी वनिता उईके ही चार-पाच महिलांसोबत तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेली होती. परंतु, काही वेळानंतर ती इतरांना दिसली नाही. त्यामुळे अन्य महिलांनी गावात फोन केला. गावातील काही लोक जंगलात गेले असता, पट्टेदार वाघ वनिताच्या मृतदेहाजवळ बसून असल्याचे दिसले. वाघ काही वेळ तिचा मृतदेह खात होता. गावकर्‍यांनी वनविभाग, पोलिस ठाणे आणि वनविकास महामंडळाला या घटनेची माहिती दिली. नागभीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कोकाटे, वनविकास महामंडळाचे एस. टी. वाढीवा, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी नागभीड येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.