वर्धा जिल्हा विकासाच्या बाबतीत आघाडीवर : पालकमंत्री डॉ. भोयर

    दिनांक :02-May-2026
Total Views |
महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन उत्साहात साजरा
 
वर्धा, 
गेल्याकाही वर्षात सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या आणि चांगल्यापणे राबविल्या. वर्धा जिल्हा देखील विकासाच्याबाबतीत मागे नाही. जिल्ह्यात विकासाचे विविध कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात देखील विकासाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे आदी उपस्थित होते.
 

 
bhokyar
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. पात्र शेतकर्‍यांना २ लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना देखील ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. यावर्षी १ हजार १०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे आपले उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली. या दोनही योजनेतून प्रतिवर्षी १२ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेद्वारे जिल्ह्यातील ८२ हजारावर पात्र शेतकर्‍यांना १४३ कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे. बोर आणि धाम या प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी ४२९ कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून घेतला.
 
 
 
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे उद्योग उभे राहिले. यातील १ हजार ७२ उद्योगांना २४ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला. ८५० पेक्षा जास्त उद्योग कार्यान्वित झाले. या उद्योगांना ९ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. नुकसानग्रस्त २ लाख ३४ हजारावर शेतकर्‍यांना ४४४ कोटी ५७ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पासाठी १० कोटी २३ लक्ष रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गेल्यावर्षात ५७६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात १ लाख ४२ हजारावर महिला लखपती दिदी झाल्या. जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘वन भवन’ आपण मंजूर करून घेतले.
 
 
वर्धा येथे लघु न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेसह सुसज्ज निवासी न्याय सहायक वैज्ञानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करतो आहे. देशाच्या १६ व्या जनगणनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिला टप्पा १ ते १५ मे या कालावधीत पार पडणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्याला निरोगी, सशक्त व समृद्ध बनविण्यासाठी प्रत्येकाने अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील याप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस परेडचे निरिक्षण केले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते सत्कार तथा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.