मला लगीन कराव पाईजे!! महिलेची थेट पोलिसात धाव

    दिनांक :02-May-2026
Total Views |
प्रयागराज
Uttar Pradesh viral video उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक वेगळाच आणि लक्षवेधी प्रकार समोर आला आहे. सराय इनायत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनापूर गावात राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने आपले कुटुंबीय लग्न करू देत नसल्याचा आरोप करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या घटनेचा केवळ १६ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
 

Uttar Pradesh viral video 
तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचे नाव माधुरी असून गेल्या अनेक वर्षांपासून ती विवाहासाठी प्रयत्न करत आहे. मात्र तिचे कुटुंबीय वारंवार तिच्या लग्नाला विरोध करत असल्याचा तिचा आरोप आहे. जेव्हा जेव्हा तिच्यासाठी एखादे स्थळ पुढे येते, तेव्हा तिचा भाऊ ते नाकारतो, असा दावा तिने तक्रारीत केला आहे. लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाच्या भीतीने भाऊ जाणीवपूर्वक लग्न लावून देत नसल्याचेही तिने नमूद केले आहे.
माधुरीने आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, तिच्या भावाने कुटुंबाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली असूनही तो तिच्या लग्नासाठी आर्थिक मदत करण्यास तयार नाही. एवढेच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून तिला कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचेही तिने सांगितले आहे. कुटुंबीयांकडून जेवण देणेही बंद केल्याचा आरोप तिने केला आहे.
तक्रारीत तिने वडील रामराज पटेल, Uttar Pradesh viral video  आई बिमला देवी, भाऊ राजेंद्र, वहिनी पूनम आणि बहीण विद्या यांच्यावर मानसिक छळ, शिवीगाळ तसेच मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. गेल्या सुमारे २० वर्षांपासून ती एकाकी जीवन जगत असून कुटुंबीयांनी तिला घरापासून वेगळे केल्याचा दावाही तिने केला आहे. एका प्रसंगी सर्वांनी मिळून तिच्या खोलीत घुसून मारहाण केल्याचेही तिने पोलिसांना सांगितले आहे.दरम्यान, या प्रकरणात तिने पोलिसांकडे भावनिक विनंती करत आपले लग्न लावून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून तिला सन्मानाने जीवन जगता येईल, असे तिने स्पष्ट केले आहे. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. दोन्ही बाजूंची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.