गाेदामातून राेख 9 लाख 55 हजार रुपये चाेरी

गुन्ह्याचा चोवीस तासांत लावला छडा

    दिनांक :02-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
warehouse दाेन विधी संघर्षग्रस्त मुलांच्या मदतीने गाेदाम फोडून राेख 9 लाख 55 हजार रुपये चाेरून नेणाऱ्या चाेरट्याला कळमना पाेलिसांना अटक केली असून त्याच्या ताब्यातून 5 लाख 54 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
 
nagpur

 
टेलिाेन एक्सचेंज चाैक येथे राहणाऱ्या नंदलाल लाहाेटी (45) यांच्या मालकीचे डिप्टी सिग्नल येथील रेल्वे क्राॅसिंगजवळ मसाल्याचे गाेदाम आहे. warehouse 25 एप्रिल राेजी सायंकाळी 7 च्या सुमारास गाेदाम कुलूपबंद करून ते घरी गेले हाेते. दरम्यान अज्ञात चाेरांनी गाेदामाचे टिन काढून आत प्रवेश केला आणि टेबलच्या ड्रावरमधील राेख 9 लाख 55 हजार रुपये चाेरून नेले हाेते. 27 एप्रिलला सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कळमना पाेलिसांनी चाेरीचा गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला हाेता.
 
 
पाेलिसांनी त्या परिसरातील सीसीुुफुटेजची तपासणी केली असता त्यात आदित्य सुरेश डेलीकर (19) रा. फवारा चाैक हा दाेन मुलांसह दुचाकीने येजा करताना दिसला. त्यावरून पाेलिसांनी आदित्यला ताब्यात घेतले असता त्याने दाेन विधी संघर्षग्रस्त मुलांसाेबत चाेरी केल्याची कबुली दिली. warehouse त्यानंतर दाेन्ही विधी संघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेण्यात आले. पाेलिसांनी दाेन्ही मुलांच्या ताब्यातून 5 लाख 4960 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पाेलिस निरीक्षक प्रवीण काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.