नागपुरात ‘आप’कडून कामगार दिन व बौद्ध जयंती साजरी

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नागपूर,
Buddhist Jayanti आम आदमी पार्टीच्या वतीने कामगार दिन आणि बौद्ध जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी शहर महासचिव डॉ. अमेय नारनवरे, शहर सचिव अलका पोपटकर, शहर सहसंघटन मंत्री गिरीश तितरमारे, शहर सहसचिव जॉय बांगडकर, शाहिद अन्वर, विकास करडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
nagpur
 
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. Buddhist Jayanti  देशातील कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा, कामाचे तास निश्चित करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रसूती रजेबाबतचे त्यांचे योगदान यांचा उल्लेख करून त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली.
 
दरम्यान, राज्य सहसचिव रजनीकांत जिचकार यांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी येथे बौद्ध जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातिभेदाचा समूळ नाश’ या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच उपस्थितांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले. Buddhist Jayanti  या वेळी प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे, महासचिव इकबाल रिझवी, क्षितिज मेश्राम, तेजराम मदान, सुभाष ढबाले आदी उपस्थित होते. सायंकाळी संघटन मंत्री रोशन डोंगरे यांच्या नेतृत्वात इंदोरा येथील बोध विहार परिसरात अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे शहरात सामाजिक ऐक्य आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
 
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र