गोविंदराव वंजारी महाविद्यालयात एआय एक्स्पो उत्साहात

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नागपूर
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागात, संस्थेच्या नवोपक्रम परिषदेच्या सहकार्याने “एआय इनोव्हेशन एक्स्पो नव्या कल्पना आणि नमुना प्रकल्प” या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
 
Govindrao Vanjari College
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागप्रमुख व संयोजिका डॉ. कल्पना मालपे यांनी प्रास्ताविक सादर करत विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजना विकसित करण्यासाठी प्रेरित केले. या स्पर्धेत ३० हून अधिक विद्यार्थी गटांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि विविध नाविन्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प सादर केले. Govindrao Vanjari College या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता सादर करण्याची संधी मिळाली.
 
प्रकल्पांचे परीक्षण डॉ. प्रीती भगत आणि प्रा. निखिल राऊत यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. Govindrao Vanjari College कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. कल्पना मालपे आणि प्रा. मनोज वैराळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे पार पडले. समारोपावेळी प्रा. मनोज वैराळकर यांनी उपस्थित मान्यवर, परीक्षक, प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
 
यावेळी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, सचिव तसेच विधान परिषदेचे सदस्य ॲड. अभिजित वंजारी आणि कोषाध्यक्षा तसेच विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. स्मिता वंजारी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Govindrao Vanjari College त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशीलता, संशोधनाची आवड आणि संघभावना वाढीस लागते, असे मत व्यक्त केले.
 
 
सौजन्य: मनोज वैराळकर, संपर्क मित्र