जेव्हा देशभरात एकाच वेळी आला अलर्ट मेसेज!!

सायरनचा गूढ वाढविणारा आवाज, आपत्कालीन विभागाने केली चाचणी

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Siren sound देशभरात शनिवारी सकाळी ११ .४५ वाजता अनेक मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. स्क्रीनवर हिंदी-इंग्रजीमध्ये एक संदेश होता. सायरन बंद झाल्यावर मोबाईलवर संदेश वाचूनही दाखवण्यात आला. यामुळे अनेक लोक अस्वस्थ झाले, तर अनेकजण गोंधळले. मात्र, सरकारने घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.
 
siren 
Siren sound  हा संदेश राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजेच एनडीएमएने पाठवला होता, जो आपत्कालीन मोबाईल अलर्ट चाचणीचा भाग आहे. छऊचअ ने आपत्कालीन परिस्थितीत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी २ मे रोजी या सेल ब्रॉडकास्ट अलर्ट प्रणालीची चाचणी केली.
Siren sound एनडीएमएने मोबाईल एसएमएसला सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाशी जोडले आहे. यामुळे निवडलेल्या परिसरात सक्रिय असलेल्या सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी अलर्ट मिळेल. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रिअल टाइम माहिती पोहोचवता येईल.
देशभरात आपत्कालीन संदेशाची एकाच वेळी चाचणी
Siren sound  शनिवारी देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी चाचणी संदेश पाठवण्यात आला. हा संदेश हिंदी आणि इंग्रजीसोबत सर्व प्रादेशिक भाषांमध्येही पाठवण्यात आला. या संदेशात लोकांना सांगण्यात आले की ही केवळ चाचणी आहे आणि यावर कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही.
सरकारने आधीच सांगितले होते - संदेशामुळे घाबरू नका
Siren sound  सरकारने दोन दिवसांपूर्वीच मेसेज पाठवून लोकांना आवाहन केले होते की, टेस्टिंगचा मेसेज मिळाल्यास घाबरू नका. शनिवारचा मेसेज केवळ आपत्कालीन परिस्थितीत इशारा देणाऱ्या प्रणालीची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

‘सचेत’ प्रणाली देशातच विकसित 
Siren sound  आपत्कालीन परिस्थितीत लोकांना रिअल टाइम अलर्ट देण्यासाठी सरकारी संस्था सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (सी-डॉट) ने ‘सचेत’ ही एकात्मिक अलर्ट प्रणाली विकसित केली आहे. सचेत नावाचे हे सिस्टम कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (सीएपी) वर आधारित आहे. हे देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय करण्यात आले आहे.