अमरावती जिल्ह्यातून यशश्री राजा अव्वल

    दिनांक :02-May-2026
Total Views |
सिद्धांत बत्रा व श्रीदा जोग प्रथम
 
अमरावती, 
Amravati: 12th results इयत्ता बारावीच्या निकालात अमरावती जिल्ह्यातल्याने नेहमीची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यातून विज्ञान शाखेची ब्रीजलाल बियाणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी यशश्री संतोष राजा ही ९७.३३ टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. जिल्ह्यातून वाणिज्य शाखेतून केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत राकेश बत्रा ९६.१७ टक्के गुणांसह प्रथम आला आहे. कला शाखेतून विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी श्रीदा शैलेश जोग ही ९५.८३ टक्के गुण घेऊन जिल्हात प्रथम आली आहे. या तिन्ही गुणवंत विद्यार्थांचे पालकांकडून भरभरून कौतुक झाले. तसेच त्यांच्या नातेवाईकांचा, वर्ग मित्रांचा, शिक्षकांचा शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. श्रीदा जोग हीने कला शाखेतून गणित विषय घेतला होता. तिने राज्यस्तरीय स्कॅश व गोल्फ मध्ये सहभाग घेतला आहे.
 
 
nikals
 
Amravati: 12th results जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.२६ टक्के लागला असून ९६.२४ टक्क्यांसह नांदगाव खंडेश्वर तालुका जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे. भातकुली तालुका तळाशी आहे. विभागात अमरावती जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाला २.७९ टक्क्याने घसरला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण यंदाही अधिक आहे. जिल्ह्यातल्या १४ तालुक्यातून ३४ हजार १४८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३० हजार १४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये १४ हजार ७०८ मुले तर १५ हजार ४३३ मुली आहे. अनुक्रमे ८४.३७ व ९२.३१ अशी त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे.