नेर :
तालुक्यातील आजंती येथील पारधी बेडा वसाहतीतील एक बालिका भर उन्हात सार्वजनिक नळावरुन पाणी आणत असताना चक्कर येऊन पडली व अल्पावधीतच तिचा मृत्यू झाला. मृतक बालिकेचे नाव Anvi Bhosale अन्वी अनाडी भोसले असून ती ९ वर्षांची आहे. शुक‘वारी संध्याकाळी ६ सुमारास ही घटना घडली.
Anvi Bhosale बालिकेच्या आकस्मिक निधनामुळे पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते बबन पवार व इतर नागरिकांनी प्रशासनाच्या उदासिनतेविरुद्ध संताप व्यक्त केला. पाण्यासारखी मूलभूत सुविधाही या वसाहतीत नसल्यामुळे उन्हातान्हात बर्याच अंतरावरुन सार्वजनिक नळावरुन पाणी आणावे लागते. या वसाहतीत उपलब्ध नसलेल्या अनेक सुविधांच्या पूर्ततेसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. परंतु त्याठिकाणी अजूनपर्यंत सुविधा शासन उपलब्ध करून देवू शकले नाही.