भरदिवसा घरात घुसून हल्ला

    दिनांक :02-May-2026
Total Views |
एक जखमी : आरोपी अटकेत
वणी :
Attack on the house सावरकर चौक परिसरात भरदिवसा घरात घुसून करण्यात आलेल्या थरारक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात एकजण जखमी झाला असून आरोपीस करण्यात आली. शुक‘वारी दुपारी ५ च्या सुमारास फर्निचरचे काम करणारे संदीप साखरकर (वय ४०) आणि दिलीप नासरे (वय ५०) यांचे इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंगच दुकान आहे. शुल्लक वादातून संदीपने धारदार वस्तूने दिलीप नासरे यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.
 
 
crime
 
Attack on the house घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा आरोपीला अटक केली. जखमी नासरे यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे.