भारत उच्च माध्यमिक विद्यालयाची निकालाची यशोगाथा कायम

    दिनांक :02-May-2026
Total Views |
बुलढाणा, 
Bharat Higher Secondary School भारत कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या यशाची परंपरा यावर्षीच्या निकालात सुद्धा कायम ठेवली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.०४% तर कला शाखेचा निकाल ९६. २९ टक्के लागला आहे . यामध्ये विज्ञान शाखेतून एकूण १०५ विद्यार्थ्यांपैकी प्राविण्य श्रेणीत ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये ०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत . तर कला शाखेचा निकाल हा ९६.२९ टक्के लागला असून २७ विद्यार्थ्यांपैकी ०७ विद्यार्थी प्राविण्यश्रेणी, १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
 
 
bharat
 
Bharat Higher Secondary School विज्ञान शाखेतून जसवंत राजेंद्र पर्‍हाड हा विद्यार्थी ९०.०० टक्के गुण घेऊन प्रथम तर अपूर्वा नागेश चित्राळे ८७.५० टक्के गुण घेऊन द्वितीय आणि अनुज जयंत किन्हीकर ८७.३३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर कला शाखेतून अपूर्वा प्रल्हाद औतकर ८९.०० टक्के घेऊन प्रथम , समीक्षा संदीप हिवाळे ८४.०० टक्के गुण घेऊन द्वितीय तर श्रद्धा दयानंद हिवाळे ८२.८३ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ सीमाताई आगाशे , उपाध्यक्ष उदय देशपांडे , सचिव अंगद आगाशे , सदस्य गजानन कुलकर्णी व सर्व संचालक मंडळ ,तसेच मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड , उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई व सर्व शिक्षकांनी कौतुक केले आहे.