मुंबई
Bigg Boss Marathi Season 6, मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा बिग बॉस मराठी सीझन ६ ने आपली ताकद सिद्ध केली आहे. ६व्या पर्वाच्या ग्रँड फिनालेने तब्बल 3.1 TVR मिळवत यावर्षीच्या सर्व मराठी रिअॅलिटी शोचे विक्रम मोडले. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हा फिनाले केवळ लोकप्रियच नाही, तर रेटिंगच्या शर्यतीतही अव्वल ठरला.
कलर्स मराठीवरील या सीझनने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं, पण महाअंतिम सोहळ्याने त्याला वेगळ्याच उंचीवर नेलं. भव्य सेट, आकर्षक सादरीकरणं आणि स्पर्धकांचा उत्कंठावर्धक प्रवास यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत राहिले. विशेष म्हणजे, शोचे होस्ट रितेश देशमुख यांच्या खास शैलीने या फिनालेला अधिक रंगत आणली. अंतिम फेरीतील स्पर्धकांनी सादर केलेल्या दमदार परफॉर्मन्सेसमुळे हा सोहळा मनोरंजनाचा परिपूर्ण पॅकेज ठरला.
या पर्वात तन्वी Bigg Boss Marathi Season 6 कोल्ते हिने आपल्या सातत्यपूर्ण खेळ आणि ठाम रणनीतीच्या जोरावर महाविजेतेपद पटकावलं. तिच्या विजयाने संपूर्ण महाराष्ट्रातून आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. 15 लाखांची रक्कम आणि मानाची ट्रॉफी जिंकत तिने या सीझनवर आपली छाप उमटवली. 3.1 TVR चा ऐतिहासिक टप्पा गाठत या शोने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नवा विक्रम केला आहे.