जिल्ह्याचा ९५.२२ टक्के निकाल, मुलींची बाजी
बुलढाणा,
Buldhana district tops Amravati division in 12th exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल दि. २ मे रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९५.२२ टक्के असून अमरावती विभागात जिल्हा अव्वल स्थानी आहे. यंदाही निकालाच्या टक्केवारी मुलींनीच बाजी मारली आहे. बुलढाणा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला यावर्षी ३४ हजार २०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३२ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण९५.२२ आहे. यामध्ये १८ हजार ५९८ मुले तर १५ हजार ६१० मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार ५४३ मुले उत्तीर्ण होऊन मुलांचे शेकडा प्रमाण ९४.३२ टक्के आहे. तर १५ हजार ६१० मुली परीक्षेला बसले असून १५ हजार ३२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत त्यांचे शेकडा प्रमाण ९६.२९ टक्के आहे.
Buldhana district tops Amravati division in 12th exam यंदाही इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेचा निकाल ९८.७५ टक्के, कला शाखेचा निकाल ८८.३१ तर वाणिज्य शाखेचा निकाल ९२.९१ टक्के आहे. व्होकेशनल शाखेचा निकाल ८३.२९ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्याचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. मोताळा ९०.४९, चिखली ९८.३८, देऊळगावराजा ९८.८७, सिंदखेडराजा ९८.०९, लोणार ९६.८७, मेहकर ९४.९५, खामगाव ९४.८९, शेगाव ८७.५५, नांदूरा ९१.०७, मलकापूर ९१.१७, जळगाव जामोद ९३.०६, संग्रामपूर ९३.८१ निकाल लागला आहे.