नागपूर,
buying gold and silver सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम लाख ४८ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. बुधवारी हा दर १ लाख ४७ हजार ९७३ रुपये होता, जो आज ६७९ रुपयांनी महागला आहे. मुख्यत: सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीची किंमत आज सकाळी २ लाख ३६ हजार ८८२ रुपये प्रति किलो झाली आहे. काल संध्याकाळी चांदीचा २ लाख ३६ हजार ३०० रुपये होता. म्हणजेच चांदीच्या भावात ५८२ रुपयांची वाढ झाली आहे. कॅरेटनुसार सोन्याचे नवे दर १० ग्रॅम असे आहेत.
४० ग्रॅमचे सोने खरेदी करणारा २५ ग्रॅमवर आला
गत काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर कमी असल्याने लग्नसराईच ग्राहक येत आहे. येत्या १७ मेपर्यंत लग्नाचे मुहूर्त असल्याने बाजारात दागिणे खरेदीसाठी वर्दळ कायम आहे. दरवाढीमुळे ग्राहक खरेदीसाठी मागे हटलेला नाही,मात्र जो ग्राहक ४० ग्रॅमचे सोने खरेदी करणारा ग्राहक आता २५ ग्रॅमवर निश्चितच आला आहे. लग्नाच्या खरेदीत ब्रायडल सेट, मंगळसूत्र, सोन्याच्या साखळ्या, हिर्याच्या अंगठ्या आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने ग्राहक खरेदी करतात, अशी माहिती लोंढे ज्वेलर्सचे संचालक राजेश लोंढे दिली आहे.
सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ होणार
गत आठवडयाभरापासून सराफा बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ किंवा घट झालेली नाही. अमेरिका-इराणमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. युध्द थांबल्यासारखे झाले असून गुंतवणुकीसाठी किंवा दागिन्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत आता ग्राहकांची वाढली आहे.buying gold and silver आगामी काळात सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ होणार असून डिसेंबर २०२६पर्यंत सोने २ लाख रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ४ लाख ५० हजार रुपये प्रति किलोवर जाण्याची शक्यता असल्याची माहिती ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली.
आता लग्नसराईची खरेदी
किंमतीत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोने-चांदीला मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर आता लग्नसराईची खरेदी होत आहे. सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबं त्रस्त असले तरी कुटुंबांतील लग्नकार्यासाठी सोने चांदी नाईलाजाने जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागत आहे. १५ मे १५ जून दरम्यान लग्नाच्या तिथी नसल्याने एक महिनापर्यंत खरेदीसाठी सराफा बाजारात वर्दळ तुलणेत कमी राहील, अशी माहिती मांगलकर ज्वेलर्सचे संचालक योगेश मांगलकर यांनी दिली.