देवळी,
Charu Tirle देवळी शहरातील जनता जुनिअर कॉलेजचा विज्ञान विभागाचा निकाल १०० टके तर कला विभागाचा निकाल ८६.४४ टके लागला. जनता जुनियर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतील १०० टके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ११८ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचा निकाल ८६.४४ टके लागला. विज्ञान शाखेत लीना महल्ले ८०.६७ टके घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली तर कला शाखेेत ललित करलुके ७८.५० टके गुण घेत कॉलेज मधून व देवळी शहरातून प्रथम स्थानी राहिला.
सृजन ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६.८१ टके लागला. १५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिया सरदार ८४.३३ टके गुण घेत कॉलेजमधून प्रथम आली. मारिया ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.१३ टके लागला. विज्ञान शाखेतून आदित्य हागे ७८.६७ टक्के गुण घेत प्रथम आला. ज्ञान भारती ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.१२ टके लागला. विज्ञान शाखेतून चारू तिरले ८८.१७ टके गुण घेत देवळी शहरातून व महाविद्यालयातून प्रथम आली. जास्मिन शेरजे व वैष्णवी वाघ यांनी ८६.८३ टके गुण प्राप्त करीत संयुक्तरित्या द्वितीय स्थान पटकाविले.
Charu Tirle एस.एस.एन.जे महाविद्यालय कला विभागाचा निकाल ८२.९२ टके लागला. या महाविद्यालयातून साक्षी पारिसे हिने ७०.३३ टके गुण प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम स्थान पटकाविले. नगरपरिषद ज्युनिअर कॉलेजचा कला विभागाचा निकाल ७२.९१ टके लागला. मोनिका मोहनापुरे ६६.८६ टके गुण घेत कॉलेजमधून प्रथम आली. यावेळेही नगरपरिषद ज्युनिअर कॉलेजने देवळी शहरातून शेवटचे स्थान कायम ठेवले आहे.