सकल हिंदू समाजाची मागणी
हिंगणघाट,
Chhatrapati Sambhaji Maharaj statue धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्य, धर्मरक्षण आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची प्रेरणा हिंदू समाजाला आजही ऊर्जा देत आहे. धर्मवीर संभाजी राजांचा पूर्णाकृती पुतळा हिंगणघाट बसस्थानक परिसरात उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आ. समीर कुणावार यांना देण्यात आले. धर्मासाठी अमानुष छळ सहन करूनही ज्यांनी हिंदुत्वाचा ध्वज झुकू दिला नाही. त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करण्याची ही वेळ आहे. हिंगणघाटमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा हिंदू समाज तीव्र लोकआंदोलन उभारण्यास मागे हटणार नाही. हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत हा आवाज बुलंद करण्यात येणार असून हिंदू एकतेची ताकद प्रशासनाला दाखवून दिली जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
Chhatrapati Sambhaji Maharaj statue आ. कुणावार यांनी सुद्धा या निवेदनाला सकारात्मकता दर्शविली असून योग्य ती कार्यवाही करून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले. सकल हिंदू समाज संघटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना, मराठा सेवा संघ, बजरंग दल यांनी पाठिंबा दिला आहे. निवेदन देते वेळी विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री शरद कोणप्रतिवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमित गावंडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख रोशन नागमोते, श्याम इडपवार, अभय संचेती, विहिंपचे ओमप्रकाश मस्कर, भाजपचे मुन्ना त्रिवेदी, श्रेयस वानोडे, आकाश छापेकर, सौरभ कावळे, रवी रहनकर, मनिष तडस, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना, बजरंग दलाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.