वर्धा जिल्ह्यात मास कॉपी तरीही निकालात घसरण; ८५.१३ टके
दिनांक :02-May-2026
Total Views |
वाणिज्य विभागाची सेजल जिल्ह्यातून प्रथम
मुलींचाच बोलबाला
वर्धा,
Class 12th results in Wardha districtवर्धा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १५ हजार ४९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३ हजार ५६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ८५.१३ टके लागला आहे. जिल्ह्यातून हिंगणघाट येथील हॉली फेथ ज्युनियर कॉलेज कॉमर्सची विद्यार्थिनी सेजल सुनील जैसवानी हिने ९६.३३ टके गुण घेत प्रथम आली. गेल्या वर्षीचा निकाल ८७.७७ टके होता, हे उल्लेखनीय. जिल्ह्यात समुद्रपूर तालुयात मास कॉपी झाली असतानाही जिल्ह्याचा निकाल मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत २ टयांनी घसरला आहे.
Class 12th results in Wardha district वर्धा जिल्ह्यात विज्ञान शाखेमध्ये ३ हजार ७०८ मुलं तर ४ हजार ६१० मुली असे एकूण ८ हजार ३१८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७ हजार ९६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९५.७६ टके लागला. कला शाखेत २ हजार ८८१ मुलं तर २ हजार २०० मुली असे ५ हजार ८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याची टकेवारी ७५.१० टके आहे. वाणिज्य शाखेत ७७४ मुलं तर ८०० मुली असे एकूण १५९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टकेवारी ८६.३२ आहे. व्होकेशनल शाखेत ४३४ मुलं तर ६९ मुली असे एकूण ५०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टकेवारी ८०.५१ आहे.
सरस्वती विद्या मंदिरचा निकाल ९९ टके
वर्धा : उज्वल निकालाची परंपरा असलेले सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मिडिअम स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेजचा निकाल ९९ टके लागला. विद्यालयातील आयुष ढेंगरे ८०.६७ टके गुण घेऊन शाळेतून प्रथम आला. वेदिका उडान ७९ टके घेऊन द्वितीय आली. ४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव संजय जलताडे, कोषाध्यक्ष मदन परसोडकर, संचालक अपर्णा हरदास यांनी अभिनंदन केले.
गांधी सिटी पब्लिक स्कूल १०० टके
वर्धा : जय महाकाली शिक्षण संस्था द्वारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टके लागला. महाविद्यालयातून नितेश वाघ ८८.८३ टके गुण घेऊन प्रथम आला. तर द्वितीय आणि तृतीय येण्याचा मान सौख्य अतकरे ८७.१७ टके आणि समर्थ वालेचा ८३.६७ टके यांनी मिळाला आहे. संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
भरत ज्ञान मंदिरम्चे यश
वर्धा ः स्थानिक भरत ज्ञान मंदिरम् कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९६. ६१ टके लागला आहे. प्रांजल राऊत हिने ८९.६७ टके गुण घेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. हर्ष नागतोडे ८७.१७ द्वितीय आणि वैष्णवी बनकर हिने ८५.८३ टके गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माधव पंडित, कार्यवाह अॅड. संध्या परेकर, उपाध्यक्ष मकरंद पाठक, संचालक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य मोनाली सोलाडकर, पर्यवेक्षिका जया देशमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूल
वर्धा : न्यू इंग्लिश हायस्कूल विज्ञान विभागाचा निकाल ९७.३८ टके, कला आणि वाणिज्य ८३.९० तर वाणिज्य इंग्लिश मीडियमचा ८०.६६ टके निकाल लागला आहे. विज्ञान विभागातून ५७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपदा ढगे हिने ९०.५० टके गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली. साई श्रीगिरीवार ८९.१७ टके (द्बितीय) तर अनुष्का बुधबावरे आणि नमन चंदोरीया यांनी अनुक्रमे ८९ टके गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेतून समीक्षा वाहारे हिने ७६.८२ टके गुण घेत प्रथम, साहील जवादे ७५.१७ टके (द्बितीय) तर श्रेयांश ठाकरे याने ७३.५० टके गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य इंग्लिश मीडियम शाखेचा तन्मय गांजरे याने ८७.६७ टके गुण घेत प्रथम, प्रतिक घुडे ८२.३३ टके गुण घेत द्बितीय तर प्रसन्ना बोरकुटे याने ८२.१७ टके गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला. वाणिज्य मराठी शाखेचा सुजय आंबुलकर आणि पवन मून यांनी ७२.१७ टके गुण घेऊन प्रथम तर यश बहाद्दूरे ६७.५० आणि खुशी थूल हिने ५७.१७ टके गुण घेऊन अनुक्रमे द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
बजाज कॉलेज ऑफ सायन्स
वर्धा : बजाज कॉलेज ऑफ सायन्स मधील इंग्रजी माध्यमाचा ९९.२० टके निकाल लागला. ११९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मानसी वालके हिने ९५.८३ टके, पलक पत्रकार ९४.८३ तर पियूष मानकर याने ९४.५० टके गुण घेत अनुक्रमे प्रथम, द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. १८ विद्यार्थी ९० टयांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमाचा निकाल ९०.८२ टके लागला असून १०९ पैकी ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गौरी वरकर ९१.१७, हर्षल आचटवार ८०.६७ तर पल्लवी पचारे हिने ७९.३३ टके गुण घेत अनुक्रमे प्रथम, द्बितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. बजाज कॉलेज ऑफ विज्ञान शाखेतून प्रसन्ना चौधरी याने ८८.५ टके गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम, उत्कर्ष निनावे ८७ टके (द्बितीय) तर चैतन्य फाले याने ८६.८३ टके गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला.
यशवंत कनिष्ठ महाविद्यालय
वर्धा : यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचा ६३ टके निकाल लागला असून २३५ पैकी १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून करण चव्हाण याने ८६.८३ टके गुण घेत महाविद्यालयातून प्रथम, मधुरा पहाडे ७६.३३ टके गुण घेत द्बितीय तर चैताली झाडे हिने ७४ टके गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच गृहविज्ञान विभागातून साक्षी राऊत हिने ७५ टके गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला.
मॉडेलची तन्वी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत प्रथम
आर्वी : बारावी परीक्षेत मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी येथील विद्यार्थिनी तन्वी धानोरकर हिने वाणिज्य शाखेत ९० टके गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्थेच्या अध्यक्ष अॅड. शोभा काळे तसेच सचिव संदीप काळे यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य पी. एन. पावडे यांनी तिचे कौतुक केले.
मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. कला शाखेचा निकाल —८१.५५ टके असून समीक्षा मुडे ७४.६७ टके घेऊन प्रथम आली. पूर्वेश केने ६९.१७ टके घेऊन द्वितीय आला. वाणिज्य शाखेचा निकाल ८६.५३ टके लागला. तन्वी धानोरकर ९० टके गुण घेऊन प्रथम आली तर प्रतीक्षा पाटील ८१.१७ टके गुण घेऊन द्वितीय आली. विज्ञान शाखेचा निकाल ९८.७९ टके लागला. सृष्टी बावणे ७८ टके घेऊन प्रथम तर कुनाली लिचडे ७७.१७ टके घेऊन द्वितीय आली. किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल ६० टके लागला.
भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयाचा निकाल ९७.२९ टके
हिंगणघाट,
भारत विद्यालय व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयाचा निकाल ९७.२९ टके लागला. १४८ पैकी १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. स्नेहा वाटमोडे हिने ८५.६७% गुणांसह विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भारत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमचा निकाल ९३.३३ टके लागला. अनुप नागतुरे याने ७३ टके गुणांसह हिंगणघाट व समुद्रपूर तालुयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, सचिव रमेश धारकर, मुख्याध्यापक हरीश भट्टड, उप मुख्याध्यापक किशोर चवरे, आदींनी अभिनंदन केले.
.............................
महेश ज्ञानपीठ हायस्कूल विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टके
हिंगणघाट,
महेश ज्ञानपीठ हायस्कूल, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल १०० टके लागला. वाणिज्य शाखेतुन समीक्षा जनबंधू हीने ९३.३३ टके गुण मिळवले. मुस्कान गजरानी हिने ९१.५० टके गुण घेत द्वितीय क्रमांक मिळाला. विज्ञान शाखेतुन आर्यन शेळकी याने ८२.३३ टके गुण मिळवले. उत्तीर्ण विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष गिरधर राठी, सचिव द्वारकादास डागा, आदींनी शुभेच्छा दिल्या.
स्व. सौ. रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाची धनश्री प्रथम
सिंदी रेल्वे,
स्व. सौ. रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाची धनश्री बावणे हिने कला विभागात ७६.८३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. साजिया परवीन शेख हिने ७०.८३ टक्के गुण प्राप्त करत द्वितीय तर अश्विनी धनराज निमजे हिने ६८.३३ टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान विभागात ओम वडांद्रे याने ७२.१७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, करण सुनील सोनटक्के याने ६१.८३ टक्के गुण तर तनवी आशिष टेंबरे हिने ५९.०० टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला. यश प्राप्त विद्यार्थी आपले यशाचे श्रेय नगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व आपल्या आई-वडिलांना देतात. विज्ञान शाखेचा निकाल ९१.६६ टके तर कला शाखेचा निकाल ६४ टके लागला.
समुद्रपूर तालुयाचा निकाल ८४.७८ टक्के
समुद्रपूर : बारावीचा निकाल तालुयाचा ८४.७८ टक्के लागला असून १६९६ पैकी १४३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जेडी चौधरी कनिष्ठ महाविद्यालय वासीची विद्यार्थिनी शुभदा वाघमारे ९३.६७ टक्के घेत तालुयात प्रथम आली. १९८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर २३८ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ६०९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी व ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संजय गांधी कनिष्ठ कला महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. तालुयातून शुभदा वाघमारे ९३.६७ टक्के घेत प्रथम आली. तक्षा मोटवानी ९३.५० टक्के घेत द्वितीय तर सर्वेश भाईमारे ९२. ८३ टक्के घेत तृतीय आला.
विद्या विकास महाविद्यालचा ९७ टक्के निकाल
समुद्रपूर : स्थानिक विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान विभागाचा ९७.१६ टके निकाल लागला. वाणिज्य विभागातून ५१, कला विभागाचे १०९, एमसीव्हिसीचे ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दिशा योगेश भट्टड जिल्ह्यातील द्वितीय
पुलगाव : आर.के. कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा योगेश भट्टड हिने बारावी परीक्षेत ९४.३३ टके गुण मिळवले. भविष्यात संगणक अभियंता म्हणून करिअर करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.८२ टक्के निकाल
सेलू : येथील दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयने ९७.८२ टक्के लागला आहे. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी तडस यांनी ७७.१७ टक्के, द्वितीय लावण्या रघटाटे यांनी ७६.६७ टक्के, तृतीय क्रमांक संजीवनी वांदिले यांनी ७२.५० टक्के गुण प्राप्त केले.
मुलाखत...
सेजलला व्हायचेय सीए
हिंगणघाट : येथील होली फेथ ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी सेजल जेसवाणी हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने ६०० पैकी ५७८ गुण मिळवत ९६.३३ टक्के गुणांसह वाणिज्य विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची आई गृहिणी असून वडील हार्डवेअर व्यवसायात कार्यरत आहेत. तिच्या दोन्ही मोठ्या बहिणीही उच्च शिक्षित आहेत. एक चार्टर्ड अकाउंटंट तर दुसरी दंतचिकित्सक शिक्षण घेत आहे. यांच्याकडून तिला सातत्याने प्रेरणा मिळाली आहे. पुढे जाऊन कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट होण्याची तिची इच्छा आहे.
या यशाचे श्रेय सेजलने आई-वडील, दोन्ही मोठ्या बहिणी, संस्थेचे सचिव जेम्स सॅम्युअल, मुख्याध्यापक बिना मँथ्यू तसेच शिक्षक हर्षल सॅम्युअल, सचिन धारकर आणि मनीषा वर्मा यांना दिले आहे.