सिंदी (रेल्वे),
agricultural materials destroy येथील अंकीत राजू कलोडे यांच्या हिवरा शिवारातील गोठ्याला गुरुवारी भरदुपारी लागलेल्या वनव्यात ३ लाखांचे शेती साहित्य जळून खाक झाले. या आगीतून अंकीतच्या सालगड्याने गायीला बाहेर काढले पण, कुत्र्याला वाचवण्यात यश आले नाही.
गुरुवार ३० एप्रिल रोजी दुपारी शिवारात अज्ञाताने लावलेल्या वणव्याच्या ज्वाळांनी अंकीत कलोडे यांच्या गोठ्याला घेरले. दृश्य बघून त्याच्या सालगड्याने त्वरित गाभण गाय सोडवली. दरम्यान, गोठ्यात ठेवलेले वैरण, स्प्रिंकलर सेट, पाईप, आदी जळत होते. आगीने रौद्ररुप धारण केल्याने बांधून असलेल्या कुत्र्याला सोडवणे शय झाले नाही. त्यामुळे आगीत जळून कुत्रा ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दोन तासात आग विझवण्यात आली. पण, गोठ्याची राखरांगोळी झाली होती. तहसिलदार शकुंतला पाराजे यांनी घटनास्थळ गाठले.agricultural materials destroy तलाठी दीपाली नाईक व मंडल निरीक्षक संजय पिसुड्डे यांनी पोलिसांच्या मदतीने पंचनामा केला. या आगीत शेतकर्याचे किमान ३ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अंकीतला सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.