सायबर गुन्हेगाराच्या घशातून काढले 13 लाख

- सायबर पोलिसांची कामगिरी

    दिनांक :02-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
cyber criminals सायबर गुन्हेगारांच्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या सापळ्यात फसून गमावलेले 13 लाख रुपये दाम्पत्याला परत मिळवून देण्यात पाेलिसांना यश आले आहे.
 

cyber criminals 
 
 
22 मार्च राेजी बेसा परिसरात राहणाऱ्या संबंधित महिलेला अज्ञात व्यक्तीचा फोन आला व त्याने ताे एटीएसमधून बाेलत असल्याचे सांगितले. महिलेच्या नावावर जारी झालेले सिमकार्ड अफझलखान नावाचा दहशतवादी वापरत असल्याची बतावणी करत आराेपीने तिला अटक करण्यात येईल अशी भीती दाखविली. महिलेने तिच्या पतीला ही माहिती दिली. त्यानंतर आराेपींनी कारवाईची भीती दाखवत डिजिटल अरेस्ट केले व 13 लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळताच महिलेने तक्रार केली. पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. तक्रार मिळताच सायबर पाेलिसांनी तातडीने बँकिंग व्यवहारांचा मागाेवा घेत संबंधित बँक खाती गाेठवली.cyber criminals न्यायालयीन प्रक्रियेनंतर महिलेची संपूर्ण 13 लाखांची रक्कम परत करण्यात आली. या प्रकरणातील आराेपी सध्या दिल्ली येथील कारागृहात असल्याची माहिती समाेर आली असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक याेगेश घारे, शंकर पांढरे, रिकेश ठाकूर, अनिल मुकनर, नाेमेश साठवणे, प्रुल्ल ठाकरे, सतीश वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.