दिल्लीत शाळांच्या फी वसुलीवर निर्बंध

पालकांना मोठा दिलासा

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi school fee rules दिल्ली शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या नव्या आदेशामुळे शहरातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशानुसार, खाजगी, विना-सरकारी अनुदानित आणि संलग्न शाळांना आता पालकांकडून एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीची फी एकाच वेळी भरण्यास भाग पाडता येणार नाही.
 

Delhi school fee rules  
शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले की, अलीकडील काळात अनेक पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही शाळा पालकांवर दोन किंवा तीन महिन्यांची फी आगाऊ भरण्यासाठी दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, संबंधित आदेश जारी करत अशा पद्धतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. संचालनालयाने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या वसुलीमुळे पालकांवर अनावश्यक आर्थिक ताण निर्माण होतो आणि हे टाळणे गरजेचे आहे.
नव्या आदेशात Delhi school fee rules  स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही खाजगी शाळा पालकांना एका महिन्यापेक्षा जास्त फी भरण्यासाठी बाध्य करू शकत नाही. शाळांनी केवळ मासिक पातळीवरच शुल्क आकारावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे फी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, या नव्या नियमामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, शाळांकडून होणाऱ्या संभाव्य आर्थिक दडपणाला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिक्षण संचालनालयाने शाळांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून, उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.