पालकमंत्र्यांनी केली ‘स्व-गणना !’

    दिनांक :02-May-2026
Total Views |
जिल्ह्यात डिजीटल स्व-गणना मोहिमेचा शुभारंभ

यवतमाळ, 
Digital self-enumeration campaigns जिल्ह्यात १६ व्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणनेला सुरुवात झाली असून पालकमंत्री संजय राठोड यांनी स्व-गणना करुन या मोहिमेचा शुभारंभ केला. संचालनालय व प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बचत भवन येथे शुक‘वारी या स्वगणना मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मु‘य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मु‘य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसीलदार विद्या शिंदे यांच्यासह वरिष्ठ कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
 
 
ganana
 
Digital self-enumeration campaigns  देशभरात जनगणनेचे कामकाज सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना हे कार्य डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागरिकांसाठी स्व-गणना करण्याची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा १ मे ते १५ मे या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. या उपक‘मामुळे स्वतःची माहिती आभासी पद्धतीने सहजपणे भरता येणार आहे. ही प्रकि‘या सुरक्षित, सुलभ व सोयीस्कर आहे. जनगणना प्रकि‘येच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सकि‘य सहभाग आवश्यक आहे. जनगणना हे राष्ट्रहिताचे कार्य असल्याने १ मेपासून सुरू झालेल्या स्व-गणनेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली स्व-गणना पूर्ण करुन या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केले.