बुद्ध जयंतीनिमित्त कामगार व प्रवाशांसाठी थंडगार ताक वाटप

    दिनांक :02-May-2026
Total Views |
नागपूर ,
Buddha Jayanti बुद्ध जयंती, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने आदर्श बहुउद्देशीय संस्था आणि भारतीय रियल इस्टेट एजंट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. मेडिकल चौक परिसरातील हनुमान नगर येथील कार्यालयासमोर कडक उन्हात काम करणाऱ्या कामगार तसेच प्रवाशांना थंडगार ताकाचे वितरण करण्यात आले.
 
Buddha Jayanti
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पूजाअर्चनेने झाली. यावेळी संस्थेच्या संस्थापक सचिव ज्योती द्विवेदी यांनी सांगितले की, संस्था गेली १८ वर्षे सातत्याने समाजसेवा करत आहे. Buddha Jayanti विविध सणांच्या निमित्ताने गरजूंना मदत करणे ही संस्थेची परंपरा असून, उन्हाळ्यात प्रवाशांना ताक वाटप करणे हे मानवतेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय रियल इस्टेट एजंट युनियनचे अध्यक्ष राजवीर सिंह यांच्या धर्मपत्नी यांनीही मानवसेवेचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला आदर्श द्विवेदी, प्राप्ती अग्रवाल, राजवीर सिंह, अशोक केशव, मिलिंद नरांजे, रोशनी सिंह, शौर्य सिंह, नीतू, सरगम, निशिकांत वाघमारे, संजय खोब्रागडे, अंकुश डाखोरे, राहुल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती द्विवेदी, राजवीर सिंह तसेच अमिता माटे यांच्या सहकार्याने करण्यात आले. Buddha Jayanti कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने प्रवाशांनी ताक वितरणाचा लाभ घेतला आणि आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमातून समाजात सेवा, एकात्मता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र